Published On : Mon, Dec 8th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा : ‘लोकराज्य’चे सात दशकांचे इतिहासदर्पण आता एका क्लिकवर

Advertisement

नागपूर – महाराष्ट्राच्या गेल्या सात दशकांच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासनिक इतिहासाचा अनमोल खजिना असलेले ‘लोकराज्य’ मासिक आता डिजिटल माध्यमातून सहज उपलब्ध होणार आहे. राज्य शासनाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकराज्य’च्या दुर्मिळ अंकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

या प्रसंगी प्राथमिक टप्प्यात डिजिटायझेशन पूर्ण केलेल्या ५० दुर्मिळ अंकांचे लोकार्पण करण्यात आले. विधानभवन परिसरातील या प्रदर्शनासाठी प्रभारी उपसचिव अजय भोसले, संचालक प्रशासन किशोर गांगुर्डे, संचालक (नागपूर विभाग) गणेश मुळे, संचालक वृत्त गोविंद अहंकारी, कक्ष अधिकारी युवराज सोरेगावकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Gold Rate
08 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,28,700/-
Gold 22 KT ₹ 1,19,700 /-
Silver/Kg ₹ 1,79,200/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराष्ट्राच्या स्थापनेपासून लोककल्याणकारी राज्य घडवताना घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, लोकप्रशासनाच्या माध्यमातून घडलेले बदल, तसेच राज्यातील ऐतिहासिक घटनांचा समावेश *‘लोकराज्य’*च्या अंकांत सातत्याने नोंदवला गेला आहे. राज्यशास्त्र, इतिहास आणि प्रशासनशास्त्र या क्षेत्रातील संशोधकांसाठी हे अंक महत्त्वाचे संदर्भग्रंथ ठरतात.

“ही संपूर्ण जडणघडण, धोरणात्मक वाटचाल आणि ऐतिहासिक पाऊलखुणांचा दस्ताऐवज आता जगभरातील वाचकांना एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गुगल व इतर प्लॅटफॉर्मवरही हे अंक सुलभ होतील,” असे ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.

‘लोकराज्य’च्या डिजिटायझेशनमुळे महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक प्रवासाचा अभ्यास अधिक सुलभ व सर्वसमावेशक होणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Advertisement
Advertisement