
नागपूर – देशभरातील सोन्या–चांदीच्या बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली असून, त्याचा थेट फायदा ग्राहकांना होत आहे. सण-समारंभ आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर खरेदी वाढत असताना भाव कमी झाल्याने सराफ बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सोमवारी सोन्याच्या किंमतींमध्ये पुन्हा घसरण नोंदवण्यात आली. त्यामुळे 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. किंमती उतरल्यानं ग्राहकांनी दुकानांकडे धाव घेतली असून दागिन्यांच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाली आहे.
आजचे सोन्याचे प्रमुख दर (25 नोव्हेंबर):
24 कॅरेट प्रति ग्रॅम: ₹12,512
22 कॅरेट प्रति ग्रॅम: ₹11,469
18 कॅरेट प्रति ग्रॅम: ₹9,384
22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम: ₹1,14,690
24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम: ₹1,25,120
चांदीचे दर:
प्रति ग्रॅम: ₹162.90
प्रति किलोग्रॅम: ₹1,62,900
कालच्या तुलनेत आज सोनं-चांदी दोन्ही धातूंमध्ये घट दिसून आली. 24 नोव्हेंबरला 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹12,583 होता, तर चांदी प्रति ग्रॅम ₹163.90 होती. आज दोन्ही धातूंमध्ये किंचित घसरण नोंदवली गेली आहे.
विविध शहरांतील आजचे दर:
केरळ, कोलकाता, नागपूर, हैद्राबाद:
22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम – ₹1,14,690
24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम – ₹1,25,120
दिल्ली, चंदीगड:
22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम – ₹1,14,840
24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम – ₹1,25,270
नाशिक:
22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम – ₹1,14,720
सूरत:
22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम – ₹1,14,740
भावात झालेल्या या घसरणीमुळे सराफ व्यापाऱ्यांमध्येही उत्साह आहे. आगामी दिवसांत लग्नाचा हंगाम अधिक जोर पकडत असल्याने ग्राहक खरेदी आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.









