
नागपूर – लकडगंज पोलिसांनी ऑपरेशन थंडर 2 अंतर्गत एक महत्वाची कारवाई करत अवैध औषधांचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात अप. क्र. 927/25 अंतर्गत एनडीपीएस कायद्यानुसार 22(b), 8(c), 18(a), 27 कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनास्थळ मासुरकर चौकाजवळील भगवती मेडिकल असून, पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा मोठ्या प्रमाणावर साठा उघडकीस आणला आहे. जप्त औषधांमध्ये फ्युफेडीन, ओवेनरेक्स, वनरेक्स सिरप, अल्प्रझोलाम, कारिसोप्रोडोल, ट्रॅमाडॉल, स्पास, व्हिगो टॅबलेट्स आणि ट्रॅमावेळ कॅप्सूल यांचा समावेश आहे. या सर्व औषधांची एकूण बाजारभाव सुमारे 1,56,601 रुपये आहे. तसेच, 91,700 रुपयांची रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे. त्यामुळे एकूण 2,48,401 रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईत तुषार अग्रवाल (रा. इतवारी) आणि भारतकुमार अमृनाणी (रा. कलमना) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींचा PCR घेत तपास सुरु केला असून पुढील कारवाईसाठी तपशीलवार चौकशी केली जात आहे.
लकडगंज पोलिसांनी या यशस्वी कारवाईमुळे अवैध औषधांच्या व्यापाराला मोठा फटका बसल्याचे अधिकारी सांगत आहेत. अशी कारवाई सामाजिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.तसेच घटनेचा पुढील तपास सुरू केला.









