Published On : Fri, Nov 14th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील मेडिट्रिना हॉस्पिटलवर अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा; डॉ. समीर पालतेवार अडचणीत!

Advertisement

नागपूर: शहरातील सेंट्रल बाजार रोडवर असलेल्या मेडिट्रिना हॉस्पिटलवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप सिद्ध होताच सीताबर्डी पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल केला आहे. व्हीआरजी हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड तर्फे हॉस्पिटलचे सीएमडी डॉ. समीर पालतेवार यांच्यावर ही कारवाई झाली आहे.

महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अरुण पेठेवार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, हॉस्पिटलने मंजूर नकाशाचा भंग करून इमारतीत विविध ठिकाणी नियमबाह्य बांधकाम केले. महापालिकेच्या झोन कार्यालयाने केलेल्या तपासणीत तळमजल्यावरील सामायिक जागेत ऑक्सिजन प्लांट आणि साहित्य साठवून अतिक्रमण करण्यात आल्याचे आढळले. तसेच सातव्या मजल्यावर टेरेस असणे अपेक्षित असताना तेथे तब्बल 421 चौरस मीटरचे बांधकाम करून पॅन्ट्री, कॉन्फरन्स हॉल, डिस्पेन्स एरिया आणि लॅबोरेटरी सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

Gold Rate
14 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,26,000 /-
Gold 22 KT ₹ 1,17,200 /-
Silver/Kg ₹ 1,62,000/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या संदर्भात महापालिकेने एप्रिल 2024 मध्ये नोटीस बजावून अनधिकृत बांधकाम काढण्याचे आदेश दिले होते. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने कोणतीही सुधारात्मक कारवाई न केल्याने अखेर प्रकरण गुन्हेगारी स्वरूपात पोलिसांकडे दाखल करण्यात आले. भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 223 तसेच एमआरटीपी कायद्याच्या कलम 52 आणि 53 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रकरणाचा तपास सीताबर्डी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी इन्स्पेक्टर विठ्ठलसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या कारवाईमुळे शहरातील आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Advertisement
Advertisement