
नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विविध ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अशाच एका कार्यक्रमात बेंगलोर येथे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित राहून अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.
यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, RSS मध्ये मुस्लीमांना सहभागी होण्याची परवानगी आहे का? या प्रश्नावर भागवतांनी दिलेलं उत्तर ऐकून संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
भागवत म्हणाले, संघात कोणत्याही विशिष्ट धर्म, पंथ किंवा जातीला बंदी नाही. संघ ‘हिंदू’ या व्यापक सांस्कृतिक संकल्पनेवर आधारित आहे. त्यामुळे मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध कोणताही व्यक्ती संघात येऊ शकतो, परंतु त्याने आपली वेगळी धार्मिक ओळख बाहेर ठेवून भारतमातेचा पुत्र म्हणून यावं लागतं.”
ते पुढे म्हणाले, “संघाच्या शाखेत आम्ही कोणाची जात, धर्म किंवा पंथ विचारत नाही. सर्वजण येथे एकाच उद्दिष्टाने येतात देशसेवा आणि समाजएकता. मुस्लीमही शाखेत येतात, ख्रिश्चनही येतात, जसे हिंदू समाजातील विविध घटक येतात. आम्ही कोणाचं गणन करत नाही आणि त्यांची संख्या मोजतही नाही.”
भागवतांच्या या वक्तव्याने सभागृहात उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवून समर्थन दर्शवलं.
त्यांनी स्पष्ट केलं की, “आपण सर्वजण भारतमातेचे पुत्र आहोत आणि संघाचं काम हे त्या भावनेभोवतीच फिरतं.”










