
नागपूर : महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत लाखो महिला लाभार्थींसाठी मोठी सूचना देण्यात आली आहे. योजनेतील ₹१५०० चा पुढील हप्ता मिळवण्यासाठी तातडीने ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या माहितीप्रमाणे, ज्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेले नाही, त्यांना १८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत आपली प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, अन्यथा पुढील हप्ते थांबवली जातील.
योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नियमित बँक खात्यात जमा करण्यात आला असून, जोपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तोपर्यंत पुढील आर्थिक मदत मिळणार नाही, अशी स्पष्ट सूचना मिळाली आहे.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे ४ सोपे पावले-
१. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ च्या अधिकृत पोर्टलला भेट द्या किंवा जवळच्या CSC/महा-ई-सेवा केंद्रावर जा.
२. ‘ई-केवायसी करा’ हा पर्याय निवडा आणि आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक भरा.
३. आधार नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP टाका किंवा बायोमेट्रिक पडताळणी करा.
४. माहिती तपासून अर्ज सबमिट करा आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा.
महिला व बाल विकास विभागाने लाभार्थी महिलांना “कधीही विलंब न करता त्वरित ई-केवायसी पूर्ण करा” असे आवाहन केले आहे, जेणेकरून त्यांना योजनेंतर्गत लाभ नियमित मिळत राहतील.










