Published On : Wed, Nov 5th, 2025
By Nagpur Today Nagpur News

मुक्त, निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज;जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या तयारीचा आढावा
Advertisement

नागपूर – राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १५ नगर परिषद आणि १२ नगर पंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार निवडणुका मुख्य, निर्भय व निष्पक्ष, पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आज पत्रकार परिषदेत विश्वास व्यक्त केला.

निवडणूका जाहीर होताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या निवडणूक सज्जतेची त्यांनी यावेळी माहिती दिली. सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेस यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद व नगर पंचायत मुख्याधिकारी यावेळी उपस्थित होते.

Gold Rate
04Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,500 /-
Gold 22 KT ₹ 1,12,100 /-
Silver/Kg ₹ 1,48,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

असा असेल निवडणूक कार्यकम-

निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात होईल. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2025 असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी 18 नोव्हेंबर 2025 रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत; तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल.

मतदारांना आवाहन-

जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले, लोकशाही मजबूत करण्यात सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. तुमच्या क्षेत्रातील इतरांना पुढे येऊन मतदान करण्यास प्रोत्साहित करा. एकत्रितपणे आपण ही निवडणूक यशस्वी करू शकतो असे ते म्हणाले.

सुमारे साडे चार हजार अधिकारी कर्मचारी कार्यरत असणार-

नगरपरिषद व नगरपंचायतिच्या माध्यमातून 546 सदस्य निवडले जाणार आहेत. एकूण 374 प्रभाग असणार आहेत. प्रारूप मतदार यादीनुसार मतदारांची संख्या सुमारे सात लाख बत्तीस हजार च्या वर असणार आहे. 27 निवडणूक निर्णय अधिकारी तर 27 सहायक निवडणूक अधिकारी कार्यरत असणार आहे. सुमारे 4 हजार 455 अधिकारी व कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

Advertisement
Advertisement