
जळगाव : वय फक्त 21 वर्षं, पण ध्येय मात्र अफाट! जळगावच्या उत्कर्ष चव्हाण या तरुण उद्योजकाने आपल्या कल्पकतेच्या आणि धैर्याच्या जोरावर ‘Mythics.in’ या डायमंड ज्वेलरी ई-कॉमर्स स्टार्टअपची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी कोणतेही बाह्य फंडिंग, मार्गदर्शन किंवा मोठा आर्थिक पाठिंबा न घेता हा व्यवसाय उभा केला आहे. तेही खऱ्या सोन्या-हिऱ्यांच्या व्यापारात, जिथे विश्वास आणि पारदर्शकता हाच पाया असतो.
उत्कर्ष चव्हाण यांनी तयार केलेले ‘Mythics’ हे प्लॅटफॉर्म भारतातील उच्च मध्यमवर्गीय ग्राहकांना परवडणाऱ्या दरात प्रीमियम डायमंड ज्वेलरी उपलब्ध करून देत आहे. त्यांच्या या उपक्रमाचा उद्देश आहे, “हिऱ्यांचं सौंदर्य सर्वांसाठी उपलब्ध करणे, फक्त श्रीमंतांसाठी नव्हे.”
टियर-३ शहरातून थेट राष्ट्रीय बाजारपेठेकडे झेप-
जळगावसारख्या टियर-३ शहरातून अशा प्रकारचा आधुनिक ई-कॉमर्स उपक्रम सुरू करणे हे स्वतःत एक धाडस आहे. उत्कर्ष म्हणतात,मी लहानपणापासून काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण संसाधने कमी होती. म्हणून मी ठरवलं. ‘मर्यादांवर मात करून काहीतरी स्वतःच उभारायचं’.
ऑनलाइन सुरक्षिततेला दिले सर्वोच्च प्राधान्य-
‘Mythics.in’ वर ग्राहकांना 100% प्रमाणित सोनं आणि हिरे, तसेच सुरक्षित ऑनलाइन व्यवहार आणि पारदर्शक दर प्रणालीचा अनुभव दिला जातो. त्यामुळे कमी वयातसुद्धा उत्कर्ष यांनी ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात यश मिळवलं आहे.
प्रेरणादायी तरुण उद्योजक-
वयाच्या 21व्या वर्षीच असा संवेदनशील आणि जबाबदार व्यवसाय उभारणं ही केवळ उपलब्धी नसून तरुण पिढीसाठी प्रेरणादायक उदाहरण आहे. उत्कर्ष चव्हाण म्हणतात,जर तुम्ही खरोखर ठरवलं आणि प्रामाणिकपणे मेहनत घेतली, तर शहर छोटं असो वा मोठं यश तुमच्याकडे येतंच.










