नागपूर : नागपूरमध्ये पोलीस आयुक्त रविन्द्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “ऑपरेशन थंडर’ एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया” मोहिमेत गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. पोलीस पेट्रोलिंग करत असताना शिवनकर नगर झोपडपट्टीत दोन संशयितांना एम.डी पावडर विकताना पकडले.
अटक करण्यात आलेले आरोपी राजु उर्फ रविराज बघेल आणि शुभम शेखर बागडे आहेत. त्यांच्या ताब्यातून ५७ ग्रॅम एम.डी पावडर, स्वीफ्ट कार, मोपेड आणि मोबाईल जप्त करण्यात आला. तपासात त्यांनी सांगितले की, हा पावडर आर्थिक फायद्यासाठी विक्रीसाठी बाळगला जात होता आणि त्यांचा साथीदार वसीम शेख असल्याचे त्यांनी कबूल केले.
दोन्ही आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला असून त्यांना नंदनवन पोलीस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस तपास सुरू ठेवत आहेत.