नागपूर : तांत्रिक ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून कंत्राटी कामगारांसाठी सुरक्षासाधनांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम १७ सप्टेंबर रोजी नागपूर येथे पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य अभियंता नागपूर परीमंडळाचे दिलीपजी दोडके, नागपूर ग्रामीण अधीक्षक अभियंता संजय वाकडे, सहाय्यक महाव्यवस्थापक महेश जाधव, जनसंपर्क अधिकारी योगेश ईटनकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, प्रभारी अधीक्षक अभियंता श्री. लोंखडे, कार्यकारी अभियंता प्रशासन विजय तिवारी आणि जी ए डिजिटल सुपरवायझर सौरभ अवसरमोल उपस्थित होते.
यावेळी दिलीपजी दोडके यांच्या हस्ते सुरक्षासाधने वाटप करण्यात आले. त्यांनी तसेच संजय वाकडे यांनी कंत्राटी कामगारांना सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगितले. महेश जाधव यांनी कामगार कायदे, हक्क व अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात तांत्रिक कामगार युनियनचे राज्य सचिव प्रकाश निकम, प्रादेशिक सचिव जयंत तुपकर, झोन सचिव कैलास सटवे, झोन सहसचिव महादेव चकोर, तर ॲप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे, प्रादेशिक सचिव कुणाल जिचकार, नागपूर संपर्क प्रमुख निशांत काळसर्पे, जिल्हाध्यक्ष मंगेश चिमोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रकाश निकम यांनी केले तर आभार प्रदर्शन कैलास सटवे यांनी मानले.










