नागपूर : पोळा सणाच्या दिवशी शहर पोलिसांनी खापरखेडा, वाडी व हुडकेश्वर पोलिस ठाणे हद्दीत जुगार अड्ड्यांवर कारवाई करून तब्बल ७१ जणांना अटक केली. या कारवाईतून ३९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना शुक्रवारी माहिती मिळाली की, खापरखेडा येथील दहेगाव दरशनवाडी लॉन परिसरात जुगार सुरू आहे. त्यानुसार खापरखेडा पोलिसांनी धाड टाकून आशिष कसामगोत्रे (४७), अलंकार कवळे (२६, दोघे रा. दहेगाव रंगारी) आणि सचिदानंद धाबळे (३६, रा. पिपळा डाकबंगला) यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, २३ ऑगस्ट रोजी रात्री ११.४५ वाजता गुन्हे शाखेच्या युनिट ५ पथकाने गुमठला येथे छापा टाकला. येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यातून सुंदरलाल विखे (४३), मुकेश धोबळे (३०, रा. ओम नगर, कोराडी), अर्जुन झुंबळे (३२, रा. बेलवाडा, गोंमती, खापरखेडा), पवन शर्मा (४१, रा. मूर्ती नगर, नागपूर), राहुल जगताप (३८), प्रकाश नागले (४८, दोघे रा. गुमठला), मोहित चंदक (३२, रा. गांधीगंज, छिंदवाडा) आणि शुभम मिश्रा (३०, रा. टाकळी) यांना अटक करण्यात आली.
याच दिवशी वाडी पोलिस ठाणे हद्दीत दत्तावाडीतील सुनंदा मोबाईल दुकानाजवळील जुगार अड्ड्यावर छापा घालण्यात आला. यातून दहा आरोपींना पकडण्यात आले. त्यात विजय घाडगे (४५), किशोर चारपो (४८, रा. स्मृती नगर, वाडी), कमलेश भोजीराज संगाथ (२५, रा. गणेश डेअरी), नरेंद्र जिंगरे (५५, रा. आदिवासी लेआऊट), शुभम नेवालकर (३०), एकनाथ दहाके (४४), लकी पिसे (२६, तिघे रा. मारोती नगर, दत्तावाडी), मनोज परळ (४९, रा. इंद्रायणी नगर), दिलीप गुंडेकर (५०, रा. शिवशक्ती नगर) आणि हरी चावरे (५२, रा. दत्तावाडी) यांचा समावेश आहे.
या सर्व कारवायांमध्ये पोलिसांनी रोकड, मोबाईल, वाहने व इतर साहित्य असा एकूण ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.