नागपूर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनपासून (व्हीसीए स्टेडियम) ते नागपूर महानगरपालिका दरम्यानच्या सखल भागातून पाणीचा निचरा त्वरीत होण्यासाठी एकीकृत प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज (ता. २२) अधिकाऱ्यांना दिले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शुक्रवारी व्हीसीए स्ट्रेडियमपासून ते सेंट ऊर्सूला हायस्कूल, आकाशवाणी चौक, उपजिल्हाधिकारी वसाहत आणि मनपा मुख्यालयापर्यंत असलेल्या ड्रेनज व पावसाळी नालीची पाहणी केली. यावेळी मनपाचे मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, धरमपेठ झोनच्या सहायक आयुक्त श्रीमती स्नेहलता कुंभार, कार्यकारी अभियंता श्री. मनोज गद्रे, उपअभियंता श्री. प्रमोद मोकाळे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपा मुख्यालयापासून जायका मोटर्सपर्यंत तसेच सेंट ऊर्सूला हायस्कूल ते आकाशवाणी चौक आणि मनपा मुख्यालय दरम्यान ड्रेनेजची सखल भागात आहे. यामुळे काही ठिकाणी पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह नाल्यात जाण्यास अडथळा निर्माण होते. यासाठी उपाय योजना करण्याचे ही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. तसेच गरज पडल्यास व्हीएनआयटी कडून सहकार्य घेण्याची सूचनाही मनपा आयुक्तांनी यावेळी केली.