नागपूर : शहरात वाढत्या मोबाईल चोरी व हरविल्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी विशेष उपक्रम राबवून उल्लेखनीय यश मिळवले आहे. परिमंडळ क्र.५ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी सायबर पथकाच्या मदतीने तब्बल २३७ मोबाईल शोधून काढले असून, त्यांची एकूण किंमत ४९ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. हे मोबाईल प्रत्यक्ष त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.
कोणत्या पोलीस ठाण्याने किती मोबाईल परत केले?
कपिलनगर – ४६ मोबाईल (किंमत ११.२४ लाख)
कळमना – २७ मोबाईल (किंमत ९.३४ लाख)
जरीपटका – २० मोबाईल (किंमत ७.५३ लाख)
कोराडी – १९ मोबाईल (किंमत ५.९८ लाख)
पारडी – २७ मोबाईल (किंमत ४.९८ लाख)
नवीन कामठी – ३१ मोबाईल (किंमत ४.५१ लाख)
यशोधरानगर – २० मोबाईल (किंमत २.८७ लाख)
जुनी कामठी – १९ मोबाईल (किंमत २.५३ लाख) एकूण : २३७ मोबाईल – ४९ लाख ६८ हजार रुपयांचा माल मालकांच्या हाती परत दिला.
पोलिसांचा नागरिकांना दिलासा-
२० ऑगस्ट २०२५ रोजी पारडी पोलीस, ठाण्यात आयोजित विशेष कार्यक्रमात हे मोबाईल परत करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली, सहपोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी व अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे यांच्या देखरेखीखाली पार पडली. पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.
दरम्यान मोबाईल शोध मोहिमेत सहायक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्यासह परिमंडळ क्र.५ मधील सर्व वपोनि व पोलीस अधिकारी – आषिश पिपरहेटे, सचिन टांगले, धनराज उमरेडकर, कुणाल हटेवार, रामचंद्र कौरती, सीमा सलमाटे, विजय गाते, गौरी हेडाऊ, सुर्यकांत सांभारे, राहुल कनोजिया यांनी विशेष परिश्रम घेतले.नागपूर पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, हरवलेल्या मोबाईलच्या शोधाबाबत नवीन आशा निर्माण झाली आहे.