नागपूर: शहरातील पाचपावली परिसरात एका भोंदूबाबाच्या धक्कादायक कारनाम्याचा खुलासा झाला आहे. हबीबुल्ला मलिक उर्फ ‘मामा’ नावाचा आरोपी, अंधश्रद्धेच्या नावाखाली गरीब आणि कष्टकरी लोकांचे शिकार करत, महिलेला जबरदस्तीने नग्न पूजा करण्यास भाग पाडत होता आणि त्याचा व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत सतत त्रास देत होता. या अत्याचाराला अखेर थांबवण्यासाठी पीडित महिलेने धैर्य दाखवत पोलिसांत तक्रार दाखल केली.
आरोपीचा प्रोफाईल-
हबीबुल्ला मलिक मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असून गेली २० वर्षे नागपूरमध्ये स्थायिक आहे. तो आपल्या भागात ‘मामा’ या नावाने ओळखला जातो. पोलिसांनी माहिती दिली की, तो नेहमी चहा टपरीवर थांबत असे, जिथे घरगुती अडचणी असलेल्या लोकांशी गप्पा मारत विश्वास संपादन करत असे. नंतर “मी काळी जादू करतो” असे सांगून महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा आणि त्यांना त्रास देत असे.
पीडित महिलेवर केलेल्या अत्याचाराची पद्धत-
महिलेला नग्न पूजा करण्यास भाग पाडल्यानंतर आरोपीने तिचा व्हिडिओ काढला आणि त्याचा आधार घेत तिला सतत धमक्या देत, अश्लील कृत्य करण्यास भाग पाडत होता. पोलिसांच्या तपासानुसार, यापूर्वीही त्याने अशाच प्रकारच्या अनेक महिलांसोबत गैरवर्तन केल्याचा संशय आहे.
पोलिस कारवाई-
महिलेच्या तक्रारीनंतर पाचपावली पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. सध्या पोलिस तपास सुरू असून, अन्य संभाव्य पीडित महिलांशी संपर्क साधून तपासाला गती देण्यात येत आहे.