नागपूर : विधानसभा सदस्य आमदार संदीप जोशी यांचा वाढदिवस आज विविध भागातील कार्यकर्त्यांनी विविध समाजपयोगी कार्यक्रम घेत ‘लोकसेवा दिवस’ म्हणून साजरा केला. दिवसभर शहरात सामाजिक, आरोग्यविषयक आणि जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयातून झाली. यानंतर बॅटरी ऑपरेटेड गाड्यांचे वितरण करण्यात आले. श्रद्धानंद अनाथ आश्रमात फळवाटप झाले तर ज्युपिटर हायस्कूल, खामला येथे आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. अमृत लॉन, मनीषनगर येथे शासकीय योजनांविषयी माहिती देणारे शिबिर घेण्यात आले.
रामेश्वरीतील संत कैकाडी महाराज उद्यानात आरोग्य शिबिराचे आयोजन झाले. धनश्री मंगल कार्यालय, भगवान नगर येथील बुद्धविहारात भंतेजींना चिवरदान करण्यात आले.
दुपारनंतर जनसंपर्क कार्यालयात भेटीगाठीचा कार्यक्रम झाला. सायंकाळी तकीया येथील बिरसा मुंडा हॉलमध्ये सुंदरकांड पठण झाले तर लुंबिनीनगर येथील बुद्धविहारात नागरिकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. भगवती लॉन, त्रिमूर्तीनगर येथे भव्य कार्यक्रम पार पडला. नरेंद्रनगर चौकात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप झाले तर काशीनगर, रामेश्वरी येथे दहीहंडी कार्यक्रमास आमदार जोशी उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त दिवसभर राबविण्यात आलेले हे उपक्रम आरोग्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात लोकसेवेची बांधिलकी अधोरेखित करणारे ठरले.
मुख्यमंत्र्यांनी दिल्या सरप्राईज शुभेच्छा
आमदार संदीप जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः आ. जोशी यांना शुभेच्छा देण्यासाठी नागपुरात दाखल झाले होते. त्यांनी प्रत्यक्ष भेटून आ. जोशी यांना शुभेच्छा दिल्यात. आपल्यासाठी हा सुखद धक्का असून त्यांच्या शुभेच्छा आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचे आ. संदीप जोशी म्हणाले.