नागपूर : शहराचा वेगाने विकास साधण्यासाठी आणि पायाभूत सुविधांना नवे बळ देण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नवी मुंबईच्या धर्तीवर ‘न्यू नागपूर’ उभारण्याच्या प्रस्तावाला समितीने हिरवा कंदील दिला आहे.
यासोबतच नागपूरमध्ये नवीन रिंगरोड उभारणे आणि ट्रक टर्मिनल विकसित करण्याच्या योजनांनाही मंजुरी देण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, या निर्णयांमुळे नागपूरचा विकासाचा वेग वाढेल आणि नागपूर मेट्रोपॉलिटन प्रदेशातील नागरिकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील.