Published On : Thu, Aug 7th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर जिल्ह्यातून ७ गुन्हेगारांवर हद्दपाराची कारवाई; डीसीपी निकेतन कदम यांचा निर्णय 

Advertisement

नागपूर: नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सतत गुन्हेगारी करत असलेल्या सात आरोपींना पोलिसांनी हद्दपार केलं आहे. परिमंडळ क्रमांक ५ चे पोलीस उप आयुक्त मा. श्री. निकेतन ब. कदम यांनी ही कठोर कारवाई केली. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.

हद्दपार केलेले आरोपी पुढीलप्रमाणे –
१) साबुद्दीन उर्फ साबु समसुधीन पठाण (वय 46)
२) लक्ष्मी विजय डोंगरे (वय 36)
३) रितेश दिगांबर मेश्राम (वय 40)
४) संगीता संतोष वर्मा (वय 35)
५) लताबाई प्रविण गेडाम (वय 42)
६) प्रतिभा संतोष यंचलवार (वय 45)
७) सुशीला उर्फ भुरी उर्फ नागीन तुलसीदास चंदेल (वय 40)

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हे सर्व आरोपी नागपूर शहरातील कळमना, नविन कामठी, जुनी कामठी आणि पारडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वारंवार गुन्हे करीत होते. त्यांच्यावर दमदाटी, मारहाण, खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे, दरोड्याची तयारी, अमलीपदार्थ आणि देशी-विदेशी दारूची अवैध विक्री आदी गंभीर आरोप आहेत. अनेकदा प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा झाली नाही.

हद्दपारीचा कालावधी असा आहे –

  • साबुद्दीन पठाण – १ वर्ष
  • लक्ष्मी डोंगरे – ६ महिने
  • रितेश मेश्राम – ३ महिने
  • उर्वरित चौघे – प्रत्येकी ६ महिने

या सर्व आरोपींना नागपूर शहर आणि जिल्ह्यातील (ग्रामीण) सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून, तसेच कन्हान, मौदा व खापरखेडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई ०७ ऑगस्ट २०२५ रोजी बजावण्यात आली.

ही कारवाई डीसीपी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण काळे (कळमना), महेश आंधळे (नवीन कामठी), नंदा मनगटे (पारडी), प्रशांत जुमडे आणि पीएसआय मिलिंद मेश्राम (जुनी कामठी) यांनी केली.

पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे गुन्हेगारीला आळा बसेल अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Advertisement
Advertisement