मुंबई. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी गुरुवारी (ता.३१) त्यांच्या मुंबई येथील ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली.
या भेटीत ऍड. मेश्राम यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे विशेष आभार मानून अभिनंदन केले. सन २००५ नंतर पहिल्यांदा अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे पृथक्करण करित दोन्ही आयोगांना वैधानिक दर्जा देण्याचे महत्वाचे काम राज्याचे संवेदनशील आणि अनुसूचित जाती-जमातीसाठी कनवाळू असलेल्या मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले, असे यावेळी ऍड. मेश्राम यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री महोदयांमुळे आज राज्यातील शेकडो अनुसूचित जाती-जमातीतील नागरिकांना न्याय मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
अनुसूचित जाती-जमातीसाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस केलेल्या कार्याबद्दल विशेष आभार मानण्यासाठी ऍड. मेश्राम यांनी ही भेट घेतली.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना त्यांच्या जन्मदिनाच्या देखील पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अनेक विषयांच्या अनुषंगाने याप्रसंगी चर्चा करण्यात आली.
यावेळी आयोगाचे वरिष्ठ लिपीक शेख अय्युब व सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी कांबळे उपस्थित होते.