नागपूर : विदर्भात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, हवामान विभागाने अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी पावसाचा तातडीचा इशारा दिला आहे. विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसाचा प्रभाव पुढील ३ तासांत अधिक तीव्र होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, झाडांखाली किंवा उघड्यावर थांबू नये, विजेपासून सुरक्षित अंतर ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे, तर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.