मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रभू श्रीरामांचे चारित्र्य, श्रीकृष्णाची बुद्धिमत्ता आणि भगवान शंकराची सहनशक्ती आहे, असे उद्गार भाजपाचे आमदार परिणय फुके यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. त्यांच्या या स्तुतीपर भाषणामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा भडका उडाला आहे.
एका सार्वजनिक कार्यक्रमात फुके म्हणाले, फडणवीस हे रामासारखे आदर्श चारित्र्य बाळगणारे, कृष्णासारखे युक्तिवादी आणि महादेवांप्रमाणे सहनशील असून, विष पचवण्याचे सामर्थ्यही त्यांच्यात आहे. त्यांच्यात सूर्यासारखे तेज आहे आणि चंद्रासारखी शीतलता.
या विधानानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी याला “अवास्तव स्तुती” म्हणून टीकेचे लक्ष्य केले, तर भाजप समर्थकांनी याचे समर्थन करत ते “खऱ्या श्रद्धेचे प्रतीक” असल्याचे म्हटले आहे. फुके यांच्या या वक्तव्याला भाजपच्या अंतर्गत गोटातही वेगळे अर्थ लावले जात असून, आगामी राजकीय घडामोडींवर त्याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.