Published On : Fri, Jul 4th, 2025
By Nagpur Today Nagpur News

  HSRP नंबर प्लेटसाठी अंतिम मुदत जाहीर, अन्यथा…; परिवहन विभागाचा इशारा 

Advertisement

मुंबई: जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्यासाठी सरकारने आता अंतिम संधी दिली आहे. ज्यांनी अद्यापही आपल्या वाहनावर HSRP नंबर प्लेट लावलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर ती बसवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परिवहन विभागाने याआधी 30 जून 2025 ही अंतिम मुदत ठरवली होती. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता ही मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी दिली.

Gold Rate
30 July 2025
Gold 24 KT 99,000 /-
Gold 22 KT 92,100 /-
Silver/Kg ₹ 1,14,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

HSRP बसवण्यासाठी transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर वेळ निश्चित करणे बंधनकारक आहे. जे वाहनचालक 15 ऑगस्टपूर्वी अपॉइंटमेंट घेतील आणि HSRP प्लेट बसवतील, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असं परिवहन विभागाने स्पष्ट केलं आहे.

मात्र 15 ऑगस्टनंतर देखील जे वाहन चालक HSRP न बसवता वाहन चालवताना आढळतील, त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी दिलेल्या मुदतीच्या आत ही प्लेट लावणे अत्यावश्यक आहे.

HSRP म्हणजे काय?
ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट असून ती वाहनाच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. या प्लेटवर एक विशिष्ट क्रमांक, राज्याचा कोड आणि एक कायमचा लॉक असतो. ही प्लेट वाहन चोरी, ओळख पटविणे आणि ट्रॅकिंगसाठी उपयुक्त ठरते.ज्या वाहनांची नोंदणी 1 एप्रिल 2019 पूर्वी झाली आहे, त्यांना ही नंबर प्लेट लावणे कायद्याने बंधनकारक आहे. मुदतीच्या आत कारवाई न केल्यास वाहनचालकाला मोठा दंड भरावा लागू शकतो.

Advertisement
Advertisement