नागपूर : शहरातील मध्यवर्ती कॅ रोडवरील हॉटेल पॅराडाइजमध्ये सुरू असलेल्या कथित सेक्स रॅकेटवर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (SSB) मोठी कारवाई केली. या धाडीत पोलिसांनी एका रशियन महिलेची सुटका केली असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई 2 जुलै रोजी संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होऊन 3 जुलैच्या पहाटे 1.55 वाजेपर्यंत चालली. संबंधित रॅकेट हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील रूम क्रमांक 403 मध्ये सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे.
FIR व कायदेशीर कारवाई-
या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात भारतीय न्यायदंड संहिता (BNS) कलम 143(2)(3) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा 1956 (PITA) अंतर्गत कलम 3, 4 आणि 5 नुसार गुन्हा क्रमांक 449/2025 असा नोंदवण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेली आरोपी-
रश्मी आनंद खत्री (वय 49), रा. प्लॉट नं. 65, गोविंदगड, शांतिनिकेतन कॉलेजजवळ, उप्पलवाडी, कंठी रोड, नागपूर हिला अटक करण्यात आली असून, कायदेशीर प्रक्रियेअंती तिला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.
फरार आरोपीचा शोध सुरू-
या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कृष्णकुमार ऊर्फ राधे देशराज हा अद्याप फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.या कारवाईत पोलिसांनी खालील साहित्य जप्त केलं आहे:
DVR सिस्टम – ₹3,000
93 कंडोम पॅकेट – ₹10
रोकड – ₹5,500
Realme मोबाईल – ₹15,000
Narzo मोबाईल – ₹15,000
हॉटेल काउंटरवरील रजिस्टर बुक – ₹500
एकूण जप्तीची रक्कम : ₹39,010
बचाव व पुढील प्रक्रिया-
मानव तस्करीच्या संशयावरून रशियन महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, तिच्या जबाबांसह सर्व कागदपत्रे तहसील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक सखोल तपास केला जात आहे.
कारवाईतील अधिकारी-
या कारवाईत पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाणे, हेड कॉन्स्टेबल किशोर ठाकरे, एनपीसी शेषराव राऊत, पोलीस शिपाई कुणाल मसराम, समीर शेख, कुणाल बोडखे, नितीन आणि महिला पोलीस पूनम शेंडे यांनी सहभाग घेतला.
पुढील तपास सुरू असून, मानव तस्करीच्या जाळ्यात आणखी कोणी गुंतले आहे का, याचा शोध घेतला जात आहे.