Published On : Fri, Jun 27th, 2025
By Nagpur Today Nagpur News

पुरीची रथयात्रा का साजरी केली जाते? जाणून घ्या पौराणिक कथा आणि भक्तीमय परंपरेचं महत्त्व!

Advertisement

पुरी-पुरीची रथयात्रा ही भारतातील एक अत्यंत श्रद्धेची आणि भव्य अशी धार्मिक परंपरा आहे, जी दरवर्षी कोट्यवधी भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पण या रथयात्रेच्या मागे नेमकं कारण काय आहे? ही परंपरा कशी सुरू झाली? यामागे एक भावस्पर्शी पौराणिक कथा आहे.

सुभद्रेला नगरदर्शनाची इच्छा-
पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान श्रीकृष्णाची बहीण देवी सुभद्रा हिने पुरी नगरीचं दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. ही इच्छा पाहून श्रीकृष्ण (पुरीत ज्यांना भगवान जगन्नाथ म्हणतात) आणि त्यांच्या मोठ्या भावाला बलराम (बलभद्र) यांनी सुभद्रेला रथावर बसवून पुरी नगरदर्शनासाठी बाहेर पडण्याचं ठरवलं.

Gold Rate
07 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,55,700 /-
Gold 22 KT ₹ 1,44,800 /-
Silver/Kg ₹ 2,55,400 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ते तिघंही रथावरून नगरभ्रमण करत असताना, वाटेत त्यांची मौसीचा मंदिर – गुंडिचा मंदिर याठिकाणी काही दिवस विश्रांतीसाठी थांबले. हा प्रसंग इतका पवित्र आणि भक्तिपूर्ण मानला जातो की, त्याची आठवण म्हणूनच दरवर्षी रथयात्रा काढली जाते.

रथयात्रेचा प्रवास आणि स्वरूप-
या उत्सवात भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची तीन वेगवेगळी रथांवर प्रतिष्ठापना केली जाते. हे तीनही रथ पुरीच्या मुख्य मंदिरातून निघून, शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या गुंडिचा मंदिरापर्यंत जातात.
तेथे हे तिन्ही देव सात दिवस राहतात, याला ‘गुंडिचा यात्रा’ असंही म्हणतात. सात दिवसांनंतर हे रथ परत मुख्य मंदिरात परततात, ज्याला ‘बहुदा यात्रा’ म्हणतात.

श्रद्धेचा महासागर-
रथयात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक पुरीमध्ये एकत्र येतात. काही भक्त तर “रथ ओढण्याचा” मान मिळावा म्हणून शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात. असे मानले जाते की, भगवान जगन्नाथाच्या रथाची दोरी ओढणं हे पुण्यप्रद, पापक्षामक आणि मोक्षदायक असतं.

भक्ती, परंपरा आणि सामूहिक एकात्मता-
पुरीची रथयात्रा ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही, तर ती भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकात्मतेचं प्रतीक आहे. यात देव आणि भक्त यांच्यातील अंतरच नाही उरत – कारण देव स्वतः भक्तांमध्ये येतो, रथावरून त्यांच्यातून जातो, त्यांच्यासोबत जगतो.

ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जात आहे. जगभरातील भक्त पुरीच्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दरवर्षी गर्दी करतात. आणि म्हणूनच, पुरीची रथयात्रा ही भक्तीचा चालत-फिरता महोत्सव ठरतो.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement