Published On : Sat, Jun 21st, 2025
By Nagpur Today Nagpur News

राज्य सरकारने केली HSRP नंबर प्लेट्स बसवण्याच्या अंतिम मुदतीत पुन्हा वाढ

१५ ऑगस्टनंतर थेट कारवाईचा इशारा

मुंबई –राज्यातील जुनी वाहने मालकांसाठी दिलासा आणि चेतावणी अशा दोन्ही गोष्टी घेऊन येणारा निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्य सरकारने उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्स (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली आहे. मात्र, हीच अंतिम संधी मानत सरकारने स्पष्ट चेतावणी दिली आहे – त्यानंतर नियम पाळले नाहीत, तर थेट कारवाईला सामोरे जावे लागेल.

ही मुदत वाढ तीसऱ्यांदा जाहीर करण्यात आली आहे. याआधी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी मार्चपासून जून अखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती.

परिवहन विभागाच्या माहितीनुसार, राज्यात सध्या १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सुमारे २.१० कोटी जुनी वाहने आहेत. मात्र त्यापैकी केवळ २३ लाख वाहनांवरच HSRP बसवण्यात आले आहेत. ही संख्या अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

परिवहन आयुक्त कार्यालयाकडून जारी निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, “१५ ऑगस्टनंतर HSRP नसलेल्या वाहनांवर अंमलबजावणी पथके कारवाई करतील. तथापि, ज्या वाहन मालकांनी १५ ऑगस्टपूर्वी अधिकृत वेबसाइटवरून अपॉइंटमेंट बुक केलेली असेल, त्यांच्यावर कारवाई होणार नाही.”

वाहनधारकांना https://transport.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून वेळ बुक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील चार कोटींपेक्षा अधिक वाहनांपैकी २.१० कोटींना HSRP लावण्याची जबाबदारी तीन कंपन्यांना देण्यात आली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सुरुवातीला वाहनधारकांना चार महिन्यांची मुदत देण्यात आली होती.

Advertisement
Advertisement