Published On : Fri, Jun 13th, 2025
By Nagpur Today Nagpur News

रामदासपेठेतील मोर हिंदी शाळेत क्रीडा सुविधा उपलब्ध होणार

नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन आयुक्तांनी दिले निर्देश
Advertisement

नागपूर : रामदासपेठ परिसरातील नागपूर महानगरपालिकेच्या बॅरिस्टर शेषराव वानखेडे विद्या निकेतन (मोर हिंदी शाळा) च्या मैदानामध्ये क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. या शाळेच्या आवारात पुरेशी जागा उपलब्ध असल्याने येथे खेळासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्या, अशी परिसरातील नागरिकांची मागणी होती. यामोठ्या मैदानात मनपातर्फे क्रीडा सुविधा उपलब्ध करण्यात याव्या याकरिता आयुक्तांनी शुक्रवारी (ता.१३) रोजी शाळा परिसराची पाहणी केली.

याप्रसंगी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, धरमपेठ झोनच्या सहायक आयुक्त श्रीमती स्नेहलता कुंभार, क्रीडा अधिकारी. डॉ. पियुष आंबुलकर, अधीक्षक अभियंता श्री. मनोज सिंग, श्री. नरेश गद्रे, उपशिक्षणाधिकारी श्री. संजय दिघोरे, उपअभियंता श्री. मोखाडे, विज्ञान केंद्र एच सी एल फाऊंडेशनचे श्री.पियुष वानखेडे, श्री.अजिंक्य कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Gold Rate
04 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,28,300 /-
Gold 22 KT ₹ 1,19,300 /-
Silver/Kg ₹ 1,79,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बॅरिस्टर शेषराव वानखेडे विद्या निकेतन (मोर हिंदी शाळा) काही वर्षांपासून बंद आहे आणि सध्या या इमारतीमध्ये एचसीएल फाऊंडेशनतर्फे अत्याधुनिक यंग कलाम विज्ञान केंद्र चालविण्यात येत आहे. तसेच एका इमारती मध्ये धरमपेठ झोन कार्यालय व शिक्षण विभागाचे जुने साहित्य तसेच कोव्हीड काळातील काही साहित्य आणि अतिक्रमण मोहिमेत जप्त करण्यात आलेले साहित्य ठेवण्यात आलेले आहेत. धरमपेठ झोन कार्यालयामार्फत या जुन्या साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी एका कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून, तो पुढच्या आठवड्यात परिसर रिकामा करेल, असे झोनच्या सहायक आयुक्त श्रीमती स्नेहलता कुंभार यांनी सांगितले.

आयुक्तांनी सर्वप्रथम संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि त्वरित परिसर मोकळा करण्याचे निर्देश दिले.त्यांनी क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांना क्रीडा सुविधा तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही दिले. क्रीडा विभागातर्फे या मैदानात स्केटिंग रिंग, बॅडमिंटन आणि पिकेल बॉलची सुविधा प्रस्तावित करण्यात येईल, असे डॉ. पियुष आंबुलकर यांनी सांगितले. तसेच खेळाडूंसाठी उत्तम स्वच्छता गृह उपलब्ध करण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले.

Advertisement
Advertisement