Published On : Tue, Jun 10th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरमध्ये नवा स्कॅम उघडकीस;बनावट ई-चालान पाठवून मोबाईल हॅक करण्याचा डाव!

-नागरिकांना सावधगिरीचा इशारा

नागपूर : शहरात डिजिटल गुन्हेगारीचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. नागपूरच्या नागरिकांना बनावट ई-चालानच्या नावाखाली मोबाइलमध्ये हॅकिंग सॉफ्टवेअर पाठवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले जाणारे हे मेसेज अधिकृत असल्याचा भास निर्माण करून नागरिकांची फसवणूक केली जात आहे.

या संदेशांमध्ये वाहन क्रमांक, वाहतूक नियम भंगाची माहिती आणि पेमेंटसाठी लिंक दिलेली असते. या लिंकवर क्लिक केल्यास एक APK फाईल (Android App) फोनमध्ये डाउनलोड होते, जी खरंतर एक धोकादायक मालवेअर असते. हे मालवेअर फोनमधील ओटीपी, मेसेज, कॉल लॉग, संपर्क यावर पूर्ण नियंत्रण मिळवते आणि ही सर्व माहिती Telegram चॅनेलवर पाठवली जाते.

Gold Rate
1 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,17,100 /-
Gold 22 KT ₹ 1,08,900 /-
Silver/Kg ₹ 1,45,800/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यामुळे बँक अ‍ॅप्समधील माहिती चोरी होऊन खाते रिकामे होण्याचा धोका निर्माण होतो. सायबर पोलिसांनी यासंदर्भात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काय करा?
-फक्त अधिकृत ई-चालान वेबसाईट वापरा:
https://echallan.parivahan.gov.in

-व्हॉट्सअ‍ॅपवरून आलेली कोणतीही अ‍ॅप फाईल डाउनलोड करू नका

-फोनमधील अ‍ॅप्सना दिलेल्या परवानग्या तपासा, अनावश्यक परवानग्या हटवा

– चांगल्या दर्जाचे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा

– संशयास्पद मेसेज मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवा
https://cybercrime.gov.in

दरम्यान सावध रहा, सुरक्षित रहा! सायबर फसवणुकीपासून बचाव ही आज काळाची गरज आहे.

Advertisement
Advertisement