Published On : Mon, Jun 9th, 2025
By Nagpur Today Nagpur News

चंद्रपूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे आणि चिमूर काॅग्रेस समितीचे अध्यक्ष प्रशांत पिसे यांचा भाजपात प्रवेश

नागपूर : माजी मंत्री तथा कॉग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे तथा चिमूर काॅग्रेस समितीचे अध्यक्ष प्रशांत पिसे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

डोंगरे आणि पिसे यांचा भाजप प्रवेश हा कॉग्रेस नेते वडेट्टीवार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

Gold Rate
11 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,800/-
Gold 22 KT ₹ 1,13,300/-
Silver/Kg ₹ 1,66,700/-
Platinum ₹ 52,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

चद्रपूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात भाजपात प्रवेश केला आहे.

डोंगरे यांच्या भाजप प्रवेशात चिमूरचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांची महत्वाची भूमिका आहे. विशेष म्हणजे आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वातच काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक चंद्रपूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे, चिमूर तालुका कॉग्रेस समितीचे अध्यक्ष प्रशांत पिसे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात भाजपात प्रवेश केला. या सर्वांचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी स्वागत केले व पुढील पक्ष कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी, माजी विधान परिषद सदस्य मितेश भांगडिया, राजु देवतळे, राजु पाटील झाडे, मनिष तुंपलीवार, डॉ. शाम हटवादे, कमलाकर लोनकर, ओम पाटील गणोरकर, पार्थ भांगडिया व इतर उपस्थित होते.

Advertisement
Advertisement