Published On : Wed, Jun 4th, 2025
By Nagpur Today Nagpur News

इस्लामचं नाव खराब करणारे प्यारे खानच; नितेश राणे यांचे प्रत्युत्तर

Advertisement


नागपूर – वर्च्युअल ईदच्या मुद्द्यावर अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केलेल्या मतांवर भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी ठाम प्रतिक्रीया दिली आहे. “इको-फ्रेंडली सण साजरे करण्याची सूचना ही सर्वधर्मीय समाजासाठी असते, त्यामुळे त्या अनुषंगाने मी मुस्लिम समाजालाही तोच सल्ला दिला होता. यावरून चुकीचा अर्थ काढणे योग्य नाही,” असे स्पष्ट करत राणे यांनी खान यांच्यावर निशाणा साधला.

राणे म्हणाले, “प्यारे खान स्वतःच आपल्या वक्तव्यांमधून इस्लाम धर्माची बदनामी करत आहेत. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रतिक्रिया देणं हे अशा पदावरील व्यक्तीला शोभत नाही.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्यारे खान यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना राणे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न कोण करतंय, हे संपूर्ण राज्य जाणून आहे. या प्रकारचा आरोप करणे म्हणजे स्वतःचीच पत कमी करणे होय.”

Gold Rate
03 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,51,300 /-
Gold 22 KT ₹ 1,40,700 /-
Silver/Kg ₹ 2,62 600 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शेवटी राणे यांनी प्यारे खान यांना आवाहन करत म्हटलं की, “इको-फ्रेंडली ईद साजरी करण्यासाठी जर तुमचं खरोखरच भल्यासाठी प्रेम असेल, तर स्वतः पुढे या आणि मुस्लिम समाजाला याबाबत आवाहन करा.”

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement