मुंबई : कश्मीरातील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा जीव गेला आणि संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना कठोर शिक्षेची ग्वाही दिली आहे. भारत सरकार नेहमीच दहशतवादाला विरोध करत असताना, या घटनेनंतर सर्वपक्षीय समर्थन मिळालं आहे. शिवसेनेच्या मुखपत्र ‘सामना’मधून या हल्ल्याच्या संदर्भात एक महत्त्वाचं मुद्दा मांडण्यात आला आहे.
राष्ट्रीय हिताचा विचार करावा, प्रचार नाही-
‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे की, सरकारने आता फक्त राष्ट्रीय हिताचा विचार करावा. पहलगाम हल्ल्याच्या नंतर काही राजकीय पक्षांनी या घटनेवर राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु असे करण्याऐवजी सरकारने कृती केली पाहिजे, असं सल्ला देण्यात आले आहे.
अग्रलेखात सांगितले आहे की, कश्मीरमधून दहशतवाद संपवला असल्याचे दावे करण्यात आले होते, मात्र हा हल्ला झाल्यावर सरकारच्या दाव्यांचा फुगा फुटला आहे. अशा परिस्थितीत सरकारने या मुद्द्यांवर राजकारण न करत, फक्त आणि फक्त राष्ट्रीय हितासाठी योग्य ती पावले उचलावीत.
पाकिस्तान आणि दहशतवाद्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक-
‘सामना’मध्ये सांगण्यात आले की, या लढाईमध्ये आपली खरी लढाई पाकिस्तान आणि दहशतवादी टोळ्यांशी आहे. भारतातील मुसलमान आणि कश्मिरी जनतेला बदनाम करणे हे राष्ट्रहिताच्या विरोधात आहे. या मुद्द्यांवर राजकारण न करता देशाने एकजूट व्हावं, असं नमूद करण्यात आलं आहे.
हल्ल्यानंतर राज्यकर्त्यांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह-
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर तातडीने बैठक घेतली, परंतु त्याबद्दल अजूनही कोणती ठोस कृती केलेली नाही. या हल्ल्यानंतर सरकारने काय ठोस निर्णय घेतले हे मांडण्याची वेळ आहे.
राजकारणापेक्षा कृती महत्त्वाची-
‘सामना’ने चेतावणी दिली आहे की, हल्ल्यांच्या घटनेवर राजकारण न करता, सरकारने देशाच्या सुरक्षेबाबत कठोर आणि तातडीने निर्णय घेतले पाहिजेत. पुलवामा आणि उरी हल्ल्यांनंतरही जनतेच्या अपेक्षेप्रमाणे सरकारने प्रभावी कारवाई केली नाही, असे सांगण्यात आले आहे.
सामाजिक एकता आवश्यक-
सामनाच्या अग्रलेखात हेही म्हटलं आहे की, पहलगाम हल्ल्यामुळे कश्मीरमधील स्थानिकांनी आपली एकजूट दाखवली. स्थानिक कश्मीरी नागरिकांनी जखमी पर्यटकांना मदत केली आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेलं. हे दाखवतं की कश्मीरमधील हिंदू आणि मुसलमान एकत्र येऊन दहशतवाद्यांच्या विरोधात उभे राहू शकतात. समाजात द्वेष पसरवण्याच्या प्रयत्नांवर तातडीने पाणी फेकत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलावीत, असं सामनाच्या अग्रलेखातून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.