Published On : Mon, Feb 10th, 2025
By Nagpur Today Nagpur News

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागपूर-चंद्रपूर-गोंदिया संघाची चमकदार कामगिरी

Advertisement

नागपूर: महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेत नागपूर-चंद्रपूर-गोंदिया संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करत अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले. धावण्याच्या शर्यतीत 5, कॅरममध्ये 3 अजिंक्य पदांसह ब्रिज, बुद्धिबळ आणि भारोत्तोलनमध्येही या संघाने बाजी मारली.

या स्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाने सर्वसाधारण अजिंक्यपद, तर पुणे-बारामती संघाने उपविजेतेपद मिळवले. बारामती येथील विद्यानगरीच्या क्रीडा संकुलामध्ये महावितरणच्या चार दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप शनिवारी (दि. 8) झाला. विजेता व उपविजेत्या खेळाडूंना महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे व पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी संचालक परेश भागवत, दत्तात्रेय पडळकर, मुख्य अभियंते राजेंद्र पवार, दत्तात्रय बनसोडे, दिलीप दोडके, पवनकुमार कच्छोट, स्वप्नील काटकर, धर्मराज पेठकर, मुख्य समन्वयक तथा मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, महाव्यवस्थापक (मासं) राजेंद्र पांडे, मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांचेसह बारामती परिमंडलातील सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, विभागप्रमुख व समितीप्रमुखांची उपस्थिती होती.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

बारामती (जि. पुणे) येथील विद्या प्रतिष्ण्ठाणच्या क्रीडा संकुल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट मैदानावर महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत राज्यभरातील 1200 हून अधिक खेळाडुंनी सहभाग घेतला. या प्रसंगी उपस्थित क्रीडा प्रेमींना संबोधित करताना संचालक (प्रकल्प ) प्रसाद रेशमे म्हणाले, बारामतीकरांचे आयोजन आणि नियोजन अतिशय चोख होते. अतिशय शिस्तबद्ध व प्रोफेशनल पद्धतीने ह्या स्पर्धा घेण्यात आल्या. क्रिकेटचे सामने महावितरणमध्ये पहिल्यांदाच लाईव्ह दाखविण्यात आले. महावितरणमध्ये दिवसेंदिवस खेळाचा दर्जा उंचावत आहे. क्रीडा स्पर्धेत हार-जीत होतच असते. परंतु अंतिम विजय हा महावितरणचाच असतो.’ पुणे प्रादेशिक संचालक व आयोजन समितीचे अध्यक्ष भुजंग खंदारे म्हणाले, ‘बारामती येथील स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणात पार पडल्या. साधी एक तक्रार सुद्धा नाही हे खिळाडू वृत्ती वाढत असल्याचेच द्योतक आहे. यावर्षी पहिल्यांदाच क्रिकेट व व्हॉलीबॉलचे सामने लिग पद्धतीने खेळवण्यात आले. त्यामुळे प्रत्येक संघाला एकमेकांशी खेळण्याची संधी मिळाली.’

Advertisement
Advertisement