नागपूर :राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात हत्यांचे सत्र सुरुच आहे. मंगळवारी सायंकाळी दारू पिण्यावरून झालेल्या वादातून बापलेकाने शेजारी राहणाऱ्या युवकाचा चाकूने भोसकून खून केला.
जितेंद्र गुर्जर (३५) असे मृत युवकाचे नाव आहे.तर आनंदराव बावनकर (६०) त्याचा मुलगा दिनेश बावनकर (२६) सर्व रा. संघर्षनगर अशी आरोपीची नावे आहेत.वाठोडा पोलिसांनी आरोपी बाप-लेकाला बेड्या ठोकल्या आहेत.मंगळवारी सायंकाळी आरोपी आनंदराव आणि जितेंद्र हे दोघेही दारू पित बसले होते.
यादरम्यान त्यांच्यात वाद पेटला. आनंदरावचा मुलगा दिनेश हा सुद्धा तेथे आला. मुलगा आल्याने वडिलांना बळ मिळाले. दोघांनीही जितेंद्रवर धारदार शस्त्राने वर करत त्याची हत्या केली.त्यानंतर दोन्ही बापलेकांनी घटनास्थळावरून पळ काढला.जितेंद्र याला मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी बाप लेकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.