
वर्धा : देशातील महिला मोदींच्या ४०० पारच्या स्वप्नाला बळ देतील. याच महिला आता देशाच्या विकासात खांद्याला खांदा लावून काम करतील. कारण येणाऱ्या २०२९ च्या निवडणुकीत ३३ टक्के महिला खासदार आणि आमदार असतील, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वर्धेत महायुतीचे उमेदवार खासदार रामदास तडस यांचे नामांकन दाखल केल्यानंतर अनेकांत स्वाध्याय मंदिरात आयोजित सभेत फडणवीस बोलत होते.
मागील दोन निवडणुकांमध्ये मोदींचीच लाट होती.आता त्सुनामी असल्याचे ते म्हणाले. गरीब जनतेसाठी मोदी यांनी राबविलेले धोरण नावलौकिक आहे. त्यांच्या याच राबविलेल्या योजनांमुळे भारत पाचवी अर्थव्यवस्था झाली. देशातील विरोधकांनी मोदी सरकार विरोधात मोट बांधली आहे.
मात्र आम्हाला पराभूत करणे शक्य नाही, असेही फडणवीस म्हणाले.
Advertisement








