Published On : Mon, Mar 11th, 2024
By Nagpur Today Nagpur News

काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ उद्या महाराष्ट्रात धडकणार;राहुल गांधी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार !

Advertisement

नागपूर :काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो न्याय यात्रा लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. उद्या मार्च रोजी नंदूरबार येथून भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल, या यात्रेची जय्यत तयारी महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकण्याचीही शक्यता आहे.

तसेच राहुल गांधी यांची १७ मार्च रोजी मुंबई शिवाजी पार्क मैदानावर विराट सभाही होणार आहे. या सभेला इंडिया आघाडीचे सर्व घटकपक्षांचे प्रमुख उपस्थित राहतील. राज्य सरकारकडून या सभेला परवानगी देण्यात आली आहे.

Gold Rate
Feb 27th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,60,600/-
Gold 22 KT ₹ 1,49,400/-
Silver/Kg ₹ 2,71,700 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात अमित देशमुख महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, खासदार के.सी.वेणूगोपाल, यांच्यासह अनेक नेते जिल्ह्यात येणार असून भारत जोडो यात्रेची तयारी करणार आहेत.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement