Published On : Wed, Mar 6th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; आरोपीला अटक

Advertisement

नागपूर : शहरात महिलांवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहे. एका बेरोजगार तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून जंगलात नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रोशन मेश्रामविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

गेल्या पाच महिन्यांपासून तरुणी नोकरीच्या शोधात होती. ३ मार्चला दुपारी दोन वाजता ती हुडकेश्वर परिसरातील सर्वश्रीनगर दिघोरी बसस्थानकाजवळ बसची प्रतीक्षा करीत होती. या दरम्यान रोशन तिच्याजवळ आला. स्वत:चे नाव सांगत एम्स रुग्णालयात सुपरवायझर असल्याची माहिती दिली.

Gold Rate
Mar 2nd, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,67,000/-
Gold 22 KT ₹ 1,55,300/-
Silver/Kg ₹ 2,87,200 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यानंतर त्याने तरुणीला त्याच्यासोबत रुग्णालयाच्या कार्यालयात येण्यास म्हटले. रोशनने तरुणीला दुचाकीवर बसवले. एम्स रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी आऊटर रिंगरोडसमोरील जंगलात घेऊन गेला. जंगलात नेऊन तिला धमकावले आणि जबरीने तिच्यावर बलात्कार केला.

पीडित तरुणीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार हुडकेश्वर पोलिसांकडे केली. पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. काही तासांतस आरोपीला अटक केली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement