Published On : Wed, Mar 6th, 2024
By Nagpur Today Nagpur News

‘हा’ कसला राजा, हा तर भिकारी’; ए. राजांच्या विधानावरुन चंद्रशेखर बावनकुळे संतापले

Advertisement

नागपूर : द्रमुक पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून भाजपच्या गोटातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विधानावरून ए. राजा यांच्यावर हल्लाबोल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. हा कसला राजा हा तर भिकारी! म्हणत त्यांनी ए. राजा यांच्यावर टीकास्त्र सोडले.

उद्धव ठाकरे यांचा उबाठा गट इंडिया आघाडीसोबत आहे आणि इंडिया आघाडीमधील पक्षाचे नेते सातत्याने सनातन धर्माविरोधात बोलत असल्याचे बावनकुळे म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत म्हटले की, भारत हे एक राष्ट्र नाही, अशी भारतविरोधी भूमिका, ‘जय श्री राम’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणांचा कधीच स्वीकार करणार नाही, ही राक्षसी महत्वाकांक्षा आणि राम किंवा रामायणावर विश्वास नाही.. असा माज करणारे द्रमुक पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांचे विधान म्हणजे राजाला लागलेले भिकेचे डोहाळे आहेत. हा कसला राजा हा तर भिकारी!! हा भारतीय सभ्यता, परंपरा व आस्थेचा अपमान आहे. वीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे दिवटे कर्नाटकचे मंत्री प्रियांक करतात.”

सनातन हिंदू धर्माचा अपमान इंडी आघाडीतील तामिळनाडूचे मुख्यमंत्री
एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी करतात… आणि आत्ता ए. राजा यांनी हद्दच केली. राष्ट्रविरोधी विधान करून आमचे आराध्य प्राणप्रिय प्रभू श्रीराम, रामायण आणि महावीर हनुमंताचे अस्तित्व नाकारण्याचा नतद्रष्टपणा केला.
उद्धव ठाकरेजी, हेच आहेत ना तुमचे मित्र आणि नवे नेते.. सावरकरांचा अपमान तुम्ही मिंधे होऊन सहन केला. आता भारतमाता, प्रभू श्रीराम, रामायण आणि हनुमानाचा अपमान तुमचे निर्लज्ज सवंगडी करू लागले…यासाठीच तुम्ही हिंदुत्वाशी फारकत घेतली, बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढे जनाब लिहू दिले. अरेरे, तुमच्याबद्दल आता कणव वाटू लागली आहे, अशी पोस्ट बावनकुळे यांनी केली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.