Published On : Fri, Dec 29th, 2023
By Nagpur Today Nagpur News

सुनील केदारांची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी, जामिनावर ३० डिसेंबरला होणार सुनावणी

Advertisement

नागपूर : काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शिक्षेच्या सुनावणीनंतर केदार यांच्यावर मेडिकलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. गुरुवारी (दि.२८) एकीकडे काँग्रेसची सभा आटोपली दुसरीकडे सायंकाळी सर्व अहवाल व्यवस्थित येताच त्यांना डॉक्टरांनी सुटी दिली व त्यांची पोलीस वाहनातून कारागृहात रवानगी करण्यात आली.

माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडून शिक्षेला स्थगिती व जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आल्यावर गुरुवारी (दि.२८) काय होणार याविषयी उत्सुकता होती. मात्र निर्णय आता 30 डिसेंबरपर्यंत पुढे गेला आहे. शिक्षेला स्थगिती संदर्भात दोन्ही बाजूनी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतरही निर्णय शनिवारपर्यंत (दि.३०) पुढे गेला आहे. यामुळे जेएमएफसी कोटनि दिलेल्या शिक्षेवर जिल्हा सत्र न्यायालय शिक्षेला स्थगिती, जामीन देणार का, केदार यांना आमदारकी बहाल होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Gold Rate
Feb20 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,400 /-
Gold 22 KT ₹ 1,44,500 /-
Silver/Kg ₹ 2,47,200 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement