नागपूर : नागपूर महानगर व ग्रामीण भागात करण्यात येत असलेल्या कुणबी जात नोंदणीच्या तपासणीत २ लाख ३३ हजार ६५३ कुणबी असल्याचे आढळून आले. आतापर्यंत २३ लाख २२ हजार २८३ अभिलेखांची तपासणी करण्यात आली. यात मराठा कुणबी ३५ आणि कुणबी मराठा अशी नोंद असणाऱ्यांची संख्या केवळ ११ आहे.
१३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीच्या नोंदी तपासल्या जात आहेत. तीन स्तरांवर तीन समित्यांच्या माध्यमातून अंमलबजावणी सुरू आहे. नागपूर जिल्ह्यात बहुसंख्य कुणबी असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात कार्यपद्धती विहीत करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील कुणबी नोंदी काढण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून संपूर्ण राज्यात मिशन मोडवर प्रक्रिया राबविण्याचे निर्देश शुक्रवार, 3 नोव्हेंबर रोजी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांना दिले.प्रदीप, विभागीय समन्वय अधिकारी डॉ. नागपूर विभाग.कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती, अंमलबजावणीसाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती आणि तालुकास्तरावर तहसीलदारांच्याअध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. उपजिल्हा दंडाधिकारी सुभाष चौधरी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.