Published On : Fri, Nov 3rd, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूर मेडिकल रुग्णालयाच्या चकाकीसाठी दररोज खर्च होणार ३८ लाख रुपये !

अमृत महोत्सवात सहभागी होणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सव सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १ डिसेंबर रोजी नागपुरात दाखल होणार आहेत. यापार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी)ने मेडिकलला चकचकीत करण्यासाठी ५ कोटी ६६ लाख रुपयांहून अधिक किमतीच्या निविदा काढल्या आहेत. हे पाहता येत्या १५ दिवसात मेडिकलची कायापालट होणार आहे. मेडिकलच्या चकाकीसाठी दररोज सुमारे ३८ लाख रुपये खर्च होणार आहेत.

रुग्णालय परिसरातील रस्ते दुरुस्त करून ते सुस्थितीत ठेवण्यासाठी ९९ लाख ९५ हजार रुपयांची निविदा काढली आहे. याशिवाय नागरी कामांसाठी ४.६६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. आणखी १२ निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ दिवसांत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश प्रशानाला देण्यात आले आहे.

Gold Rate
12 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,100 /-
Gold 22 KT ₹ 1,02,400 /-
Silver/Kg ₹ 1,28,300/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

इतकेच नाही तर मेडिकलमध्ये ज्या ठिकाणी हा सोहळा पार पडणार आहे. केवळ त्याठिकाणाचा खर्च २२ लाख रुपये इतका असेल. याशिवाय रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ३१ ते ४५च्या रंगरंगोटी व इतर छोट्या कामांसाठी २६ लाख २३ हजार रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे.

वॉर्ड क्रमांक १ ते ६ साठी २१ लाख ५३ हजार रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच ओपीडी, इमारतींची रंगरंगोटी, वसतिगृहे, प्रशिक्षण संस्था, स्वच्छता, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता या कामांतर्गत होणार आहे. परिसराची स्वच्छता, मलबा हटवणे, ड्रेनेज आणि पाण्याच्या टाक्या यासाठी ५५ लाख रुपये इतका खर्च होणार असून रस्त्यांच्या डागडुजीसाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

Advertisement
Advertisement