Published On : Sat, Oct 7th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या जयेशने नागपूर मध्यवर्ती कारागृहात लोखंडी तार गिळल्याने खळबळ !

Advertisement

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी देणारा दहशतवादी जयेश पुजारी ऊर्फ शाकीर हा नागपूर कारागृहात शिक्षक भोगत आहे. मात्र जयेश याने लोखंडी तर गिळल्याने खळबळ उडाली. कारागृह प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने जयेशला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकारामुळे कारागृह प्रशासन व सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहे.

जयेशने हा प्रकार नेमका कधी केला हे कारागृहातील कर्मचाऱ्यांनादेखील लक्षात आले नाही. त्याने फारच छोटा तार तोडून गिळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यावर त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. त्याची सोनोग्राफीदेखील करण्यात आली असून त्यातदेखील काहीच आढळले नाही. आता त्याची प्रकृती बरी असल्याची माहिती नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या उपअधीक्षक दीपा आगे यांनी दिली.

Gold Rate
26 July 2025
Gold 24 KT 98,300 /-
Gold 22 KT 91,400 /-
Silver/Kg 1,13,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात १४ जानेवारी आणि २१ मार्च रोजी जयेशने फोन करून खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास गडकरींना उडवून देण्याची धमकी दिली होती. कर्नाटकमधील तुरुंगातून त्याने हे फोन लावले होते. २८ मार्च रोजी त्याला बेंगळुरू तुरुंगातून अटक करून नागपुरात आणण्यात आले.

चौकशीदरम्यान त्याचा दहशतवादी संघटनांशी संबंध आणि त्यांच्या मदतीने अनेक मोठ्या दहशतवादी घटना घडवून आणल्याचा खुलासा झाला. त्याच्याविरोधात यूएपीएअंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. जयेश न्यायालयीन कोठडीत असून त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement