नागपूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्री पदावरुन उचलबांगडी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु झाली आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची मागणी मान्य अद्याप मान्य करण्यात आली नाही. छगन भुजबळ यांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद हवे होते. मात्र अद्यापही त्यांना ते देण्यात आले नाही. तर नाशिकचे पालकमंत्री पद विद्यमान शिवसेनेचे दादा भुसे यांना देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या नव्या पालकमंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. पुण्याचे पालकमंत्रीपदी अजित पवार यांना दिल्यानंतर आता भाजपचे चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री असणार आहे.
१२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी :
१. पुणे – अजित पवार
२. अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील
३. सोलापूर – चंद्रकांत दादा पाटील
४. अमरावती – चंद्रकांत दादा पाटील
५. वर्धा – सुधीर मुनगंटीवार
६. भंडारा – विजयकुमार गावित
७. बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील
८. कोल्हापूर – हसन मुश्रीफ
९. गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
१०. बीड – धनंजय मुंडे
११. परभणी – संजय बनसोडे
१२. नंदूरबार – अनिल भा. पाटील