Published On : Tue, Sep 5th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूरजवळच्या पारशिवनी तालुक्यात प्रेमीयुगलाची एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या !

Advertisement

नागपूर : जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील पेंढरी येथे एका महाविद्यालयीन युवक-युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गौरव राजेंद्र वाघमारे (१८) आणि जानव्ही जीवन नायले (१८) दोघेही रा.पेंढरी अशी मृतांची नावे आहे. या दोघांमध्येही प्रेम संबंध असल्याची माहिती आहे.

माहितीनुसार, गौरव हा सावनेर येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता तर जानव्ही पारशिवनीच्या हरिहर महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. मागील वर्षभरापासून दोघांचे प्रेमसंबंध सुरु होते. मात्र अचानक पेंढरी गावातील एका पडक्या घरात मंगळवारी (दि.५) पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास या दोघांनी गळफास घेतला. या घरात दोघांचेही लटकलेले मृतदेह आढळून आले. या दोघांनी एकाच दोराला गळफास लावून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली.

Gold Rate
07 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,55,700 /-
Gold 22 KT ₹ 1,44,800 /-
Silver/Kg ₹ 2,55,400 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पारशिवनी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून दोघांच्या प्रेमाला कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, असा पोलिसांना संशय आहे. पारशिवनी पोलिसांनी घटनास्थळ दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement