Published On : Thu, Aug 17th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील राजश्री नगर येथे अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ !

Advertisement

नागपूर : अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजश्री नगर येथे आज सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेहअर्धवट जळालेला आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजश्री नगर येथील मोकळ्या मैदानात आज अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

हा मृतदेह पुरुषाचा असून त्याचे वय 35 ते 45 वर्षे असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पूर्णपणे कुजलेला असून अर्धवट जळालेला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी प्रसार माध्यमांना दिली.

Gold Rate
29 May 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver/Kg 98,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच अजनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल केला असून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement