नागपूर: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ अभियाना अंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील मनपाच्या सहा शाळांमध्ये वीर स्वातंत्र्य सेनानींचे नामोल्लेख असलेले शिलाफलकम उभारण्यात आले. या सहाही शिलाफलकमचे शुक्रवारी (ता.११) मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य यांचा सत्कार करून वंदन केले गेले.
मध्य नागपुरातील पन्न्लाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळेमध्ये आमदार श्री. विकास कुंभारे यांच्या हस्ते शिलाफलकमचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी व माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांची विशेष उपस्थिती होती. मनपाचे मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, सहायक आयुक्त श्री. गणेश राठोड, कार्यकारी अभियंता श्री. रक्षमवार, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, शाळा निरीक्षक श्रीमती सीमा खोब्रागडे, मुख्याध्यायापक श्री. दीपक वसुले आदी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार श्री. विकास कुंभारे म्हणाले, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील स्वातंत्र्य सैनिक परिवाराचा आणि माजी सैनिकांचा सन्मान केला जात आहे. शिलाफलकम पासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि ते सुद्धा मातृभूमीच्या रक्षणासाठी पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, शिलाफलकम मुळे विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण होउ शकेल. या क्षेत्रातील वीर सैनिक, ज्यांनी देशाचा रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्यांचे नाव शिलाफलकम वर लावण्यात आले आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावण्याचे आवाहन देखील आयुक्तांनी यावेळी केले. तसेच त्यांनी वीर स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवाराचे आभार मानले.
माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी थोर स्वातंत्र्य सैनिक शहीद शंकर महाले, शहीद कृष्णराव काकडे आणि लाल सेनेची प्रेरणादायी कथा सांगितली. शाळेतील मुलांना दिल्लीच्या ‘वॉर मेमोरियल’चा व्हिडिओ दाखविण्यात यायला हवा तसेच शाळेतील मुलांना एन.सी.सी. सुद्धा अनिवार्य करण्यात यावे, असे देखील ते म्हणाले.
यापूर्वी मान्यवरांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. स्व पन्नालाल देवाडिया, सावित्रीबाई फुले यांचा तैलचित्राला माल्यार्पण करण्यात आले. मान्यवरांनी शाळेतील आवारात उभारण्यात आलेल्या शिलाफलकमचे अनावरण केले.
मान्यवरांनी स्वातंत्र्य सैनिकी परिवाराचे सदस्य श्रीमती मधुजी देवाडिया, श्री. सुनील भाऊ चांदपूरकर, डॉ. संतोष मोदी, श्री. अजय टक्कामोरे यांच्यासह माजी सैनिक श्री. सुशील तुप्ते, श्री. नीलेश पाटील, श्री. विनोद ठाकरे, श्री. आशिष घुमरे, श्री. शेख अयाज, श्री. रुपेश ठाकरे, श्री. संजय ठाकरे, श्री. रवी चौधरी, श्री. अजमल खान, श्री. डी.व्ही. दुपारे यांचा मनपाचा मनाचा दुपट्टा, सन्मान चिन्ह आणि शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
दुर्गा नगर माध्यमिक शाळा
याशिवाय दक्षिण नागपुरातील दुर्गा नगर माध्यमिक शाळेत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते शिलाफलकम चे अनावरण झाले. यावेळी माजी नगरसेविका कल्पना कुंभलकर, रुपाली ठाकुर, कार्यकारी अभियंता मनोजकुमार सिंग, सहायक शिक्षणाधिकारी श्री. संजय दिघोरे, शाळा निरीक्षक विणा लोणारे, केंद्र प्रमुख श्री. घाईत, अभियंता प्रवीण आगरकर, स्वच्छता अधिकारी दिनेश कलोडे, मुख्याध्यापिका टेरेसा जॉर्ज, प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती ममता खुदरे, भारती गजाम, श्रीकांत गडकरी, माधुरी शेंडे, ज्योती मेंडपिलवार, प्रिती पांडेय, कृष्णा उजवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात परिसरातील स्वातंत्र्य सैनिक कुटुंबातील सदस्य श्री. प्रल्हाद कुकडे, श्रीमती कल्पना रहाटे, संरक्षण दलात सेवा बजावणारे कारगील योद्धा श्री. सुनील मानकर यांचा मनपाचा मानाचा दुपट्टा आणि शाल, श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात श्री. मानकर यांनी कारगील युद्धातील अनेक प्रसंग कथन केले. यावेळी शाळेच्या परिसरात मान्यवरांनी वृक्षारोपण करून ‘वसुधा वंदन’ उपक्रमाची अंमलबजावणी देखील केली.
संजय नगर हिंदी माध्यमिक शाळा
पूर्व नागपुरातील संजय नगर हिंदी माध्यमिक शाळेमध्ये पूर्व नागपूरचे आमदार श्री. कृष्णा खोपडे यांच्या हस्ते शिलाफलकमचे अनावरण झाले. यावेळी कार्यकारी अभियंता श्री. माटे, माजी नगरसेविका सरिता कावरे, चेतना टांक, माजी नगरसेवक श्री. अनिल गेंडरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंदनमलागर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय सोनी, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्याम गोहोकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमात स्वातंत्र्य संग्राम सेनानी सर्वश्री दिलीप सूर्यवंशी, कॅप्टन सुधीर सुडके, एस. राजेश यांना मनपाचा मानाचा दुपट्टा आणि शाल, श्रीफळ देउन सन्मानित करण्यात आले.
विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळा
दक्षिण-पश्चिम नागपुरातील विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळेमध्ये माजी स्थायी समिती सभापती श्री. प्रकाश भोयर यांच्या हस्ते शिलाफलकमचे अनावरण झाले. यावेळी सहायक आयुक्त श्री. मिलींद मेश्राम, कार्यकारी अभियंता श्री. रवींद्र बुंधाडे, माजी नगरसेविका श्रीमती पल्लवी श्यामकुळे, श्रीमती मिनाश्री तेलगोटे, श्रीमती लक्ष्मी यादव, शाळा निरीक्षक श्रीमती अश्विनी फेद्देवार, मुख्याध्यापक श्री. राजकुमार बोंबाटे, प्राथमिक मुख्याध्यापिका नूतन चोपडे, दिवाकर मोहितकर, नंदा बोहरपी आदी उपस्थित होते.
वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळा
पश्चिम नागपुरातील वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळेमध्ये सहायक आयुक्त श्री. प्रकाश वराडे, माजी नगरसेवक श्री. संजय बंगाले, श्री. सुनील हिरणवार, श्री. प्रमोद कौरती, माजी नगरसेविका श्रीमती वर्षा ठाकरे यांच्या हस्ते शिलाफलकमचे अनावरण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विलास बल्लमवार, शिक्षिका मंजूषा फुलंबरकर, संजय म्हाला उपस्थित होते. कार्यक्रमात माजी सैनिक कर्नल मुकेश सहारे, श्री. भारत कुकलोरी, सुभाष चोरपगार, श्री. विवेक बोबडे, श्री. बंडू येलमुले, श्री. मकरंद दुरूगकर, श्री. प्रविण लोखंडे यांना मनपाचा मानाचा दुपट्टा, शाल, श्रीफळ देउन सन्मानित करण्यात आले.
एम.ए.के.आझाद उर्दू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय
उत्तर नागपुरातील एम.ए.के.आझाद उर्दू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सहायक आयुक्त श्री. हरीश राउत यांच्या हस्ते शिलाफलकम चे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मोहम्मद जमाल, मो.इब्राहिम तौफीक अहमद, अभियंता श्री. पाजारे, उपद्रव शोध पथकाचे सुभेदार मोरेश्वर मदवी, मुख्याध्यापक श्री. धैर्यशील वाघमारे आदी उपस्थित होते.
शहरातील विविध भागांमधील सहा शाळांमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी स्थानिक शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांचे महत्वाचे सहकार्य लाभले.