नागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे (माफसू) तीन वर्षीय नवीन डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात येत आहे. या कोर्सला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचा विरोध आहे. यासंदर्भात विद्यार्थी मागील अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. परंतु विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर विद्यार्थांनी गुरुवारपासून संप पुकारला. आज संपाचा पाचवा दिवस असून विद्यार्थांनी आक्रमक पवित्रा घेत पशुवैद्यकीय विद्यापीठालाकुलूप ठोकले आहे.
पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांची दिशाभूल करून न डिप्लोमा सुरु केला जात आहे. १२ वी नंतर तीन वर्षीय हा डिप्लोमा आहे. आधीच जुना डिप्लोमा कोर्स आहे, अशा परिस्थितीत नवीन डिप्लोमा कोर्सची गरज काय? असा सवाल विद्यार्थांनी उपस्थित केला.
इतकेच नाही तर सरकारने माफसूच्या कायद्यात बदल करून खासगी महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. खासगीकरणाच्या विरोधात या विद्यार्थ्यांनी हा बेमुदत संप पुकारला आहे.