ऑनलाइन गेमिंगचे (Online Game) अॅप तयार करून उद्योगपतीची तब्बल 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियात (Gondia Crime) समोर आला आहे. पोलिसांनी (Nagpur Police) याप्रकरणी पोलिसांनी जवळपास 10 कोटींची रक्कम ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरातूनच ही रक्कम जप्त केली आहे. अनंत उर्फ सोमटू जैन असे आरोपीचे नाव असून तो सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपीचे फिर्यादीशी मैत्रीपूर्ण संबंध होते. मागील दोन वर्षांपासून या गेमच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने फसवणूक करत आरोपीने तब्बल 58 कोटी रुपयांचा फिर्यादीला गंडा घातला. नागपूर पोलिसांकडे तक्रार प्राप्त होताच तपास सुरु करण्यात आला. आरोपी हा गोंदियाचा असल्याचे कळताच पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला असता मोठी रक्कम सापडली आहे. आरोपीच्या घरातून पोलिसांना कोट्यावधी रुपये मिळून आले.
सध्या पैशाची मोजमाप सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः दहा कोटी रुपयांची मोजणी झाली आहे. तसेच चार किलोचे सोनंही घरात मिळाल्याची माहिती समोर येत आहे.