मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात फूट पाडत शिंदे आणि भाजप सरकारसोबत हातमिळवणी केली. तसेच त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. अजित पवार यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे.
त्यांच्या वाढदिवसामुळे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
अजित पवारांच्या वाढदिवसानमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी होर्डिंग्स लावले आहेत. यातच मदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटनेही राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष वेधले.
“मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व…, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केल्याने उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत.
रायगडच्या खालापूरमधील इर्शाळवाडीत घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. यात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
यापार्श्वभूमीवर अजित पवार यांनी त्यांच्या वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन त्यांच्या कार्यकर्त्यांना तसेच हितचिंतकांना केले आहे. “कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नका. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर पैसे खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पूर्नउभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असे अजित पवार म्हणाले.