Published On : Fri, Jun 30th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात वडिलांनी अभ्यासासाठी रागविले म्हणून मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

Advertisement

नागपूर : सतत अभ्यास सोडून मोबाईवर असणाऱ्या मुलीला तिच्या वडिलांनी रागावले. यामुळे मुलगी इतकी दुखावली गेली की तिने घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत जाऊन पंख्याला स्कार्फ बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. नंदिनी अविनाश मोहिते (१५, मेहरबाबा नगर, वर्धा रोड) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री 9.30 च्या सुमारास घडली.

माहितीनुसार, मुलगी वडिलांच्या मोबाईलसोबत खेळत होती. मुलगी अभ्यास सोडून टाईमपास करत असल्याने वडिलांनी तिला खडसावले. यामुळे मुलीने पहिल्या मजल्यावरच्या खोलीत पोहोचून पंख्याला स्कार्फ बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने घरातील सदस्य तिला जेवणासाठी बोलावण्यासाठी गेले असता रवाजा आतून बंद होता.

Gold Rate
08 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,01,800 /-
Gold 22 KT ₹ 94,700/-
Silver/Kg ₹ 1,15,800/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दार ठोठावल्यानंतरही दरवाजा न उघडल्याने खिडकीतून डोकावले असता नंदिनी लटकलेली दिसली.नातेवाईकांनी दरवाजा तोडून आत जाऊन तिला खाली उतरविले. यानंत तातडीने तिला एम्स रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याची माहिती तातडीने बेलतरोडी पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला.

Advertisement
Advertisement