Published On : Thu, Jun 29th, 2023
By Nagpur Today Nagpur News

विठ्ठल भक्तीने पंढरी सजली…मुख्यमंत्री यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची महापूजा

काळे दाम्पत्य मानाचे वारकरी

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तीने पंढरी सजली आहे. यंदा दशमीला सायंकाळपर्यंत जवळपास ८ ते ९ लाख भाविक दाखल झाले आहेत. बुधवारी दुपारी विठ्ठलाची दर्शनरांग पत्राशेड १० च्या पुढे गेली होती.टाळ-मृदंग, भजन, कीर्तन आणि भाविकांची गर्दी दिसून येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी येथील भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला मानाच्या वारकरीचा मान मिळाला.

राज्यात चांगला पाऊस पडू दे, शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ देत, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायांना घातले.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान विठ्ठलाची शासकीय महापूजा गुरुवारी पहाटे 2 वाजून 57 मिनिटांनी पार पडली. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश खाडे, सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, कृषिमंत्री दादा भुसे, खा. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेचे सीइओ दिलीप स्वामी, देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर महाराज यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement