Advertisement
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात विहीर खोदण्यासाठी कामावर ठेवले 11 मजुरांना पळून जाऊ नये म्हणून कंत्राटदाराने त्यांना साखळीने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) महाराष्ट्र सरकार आणि राज्य पोलीस प्रमुखांना नोटीस बजावली आहे .
ही घटना “कायद्याची भीती न बाळगता, कंत्राटदारांच्या अशा क्रूरतेपासून मजुरांचे संरक्षण करण्यात स्थानिक प्रशासन कसे अपयशी ठरते स्पष्टपणे दर्शवते.
तसेच कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना इतक्या गंभीर प्रकरणाविषयी कसे माहिती नाही, असा संतप्त सवाल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने उपस्थित केला. जर प्रसार माध्यमांमध्ये छापून आलेला मजकूर करा असेल तर हे प्रकरण कामगारांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे ठरेल
Advertisement