नागपूर : महापालिकेत कंत्राटी सहायक विधी पद भरतीत घोटाळा केल्याच्या आरोप अँड. राहुल परमेश्वर झांबरे यांनी केला. यासंदर्भात त्यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याबाबत तक्रार दाखल केली.
नागपूर महानगर पालिकेने 27 मार्च 2023 ला जाहिरात क्रमांक 752/ज. स./2023 चा अनुषंगाने कंत्राटी विधी अधिकारी सहायक या एकूण 3 पदासाठी जाहिरात काढली होती. त्यावर अर्जदार यांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार नोंदविली होती की या जाहिरातीमध्ये राज्य सरकारच्या बिंदू नामावलीला बाजूला ठेऊन मागासवर्गीय समाजावर अन्याय करीत आरक्षणाला मूठमाती देण्यात आली. जे संविधानातील मागासवर्गीयांच्या नमूद असलेल्या आरक्षणाची गळचेपी करणारा आहे.तसेच यासंदर्भात राष्ट्रीय अनुसूचित आयोगकडेही तक्रार नोंदविण्यात आली असून त्याअनुषंगाने आयोगाने मनपा आयुक्तांना नोटीस बजावली होती. त्यामध्ये नागपूर महापालिकेने आस्थापना वर नसलेल्या पदाची भरती काढली असे कबुल करण्यात आले. ही बाब अतिशय गंभीर असून असंविधानिक आणि बेकायदेशीर असल्याचे प्रथम दृष्ट्या दिसून येत आहे, असे तक्रारदार झांबरे यांचे म्हणणे आहे.
मनपा आयुक्तांना साधे पदाचे नाव जरी बदलवायचे असल्यास त्याला शासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते. परंतु मनपा आयुक्त राधाकृष्णन बी .यांनी हेतूस्फुरपणे कंत्राटी विधी अधिकारी सहायक हे पद तयार केले. असा कोणताही अधिकार मनपा आयुक्तांकडे नाही . कारण नवीन पद तयार करायच असल्यास त्याची शैक्षणिक पात्रता, कामाचे स्वरूप,सेवा नियमावली ठरविण्याचे सर्व अधिकार हे राज्य शासनाला आहे. मात्र मनपा आयुक्तांनी या संदर्भात कोणाचीही परवानगी न घेता परस्पर निर्णय घेतला. तसेच कंत्राटी विधी अधिकारी सहायक हे पदनाम आहे. त्या अंतर्गतच औद्योगिक न्यायालय/जिल्हा न्यायालय कामकाजकरिता 3 पदे निवळ कंत्राटी तत्वावर 6 महिन्याचा कालावधी करिता भरणार असल्याचे मनपा तर्फे सांगितले.
संविधानातील आरक्षणाचा तरतुदी नुसार बिंदु नामावली लागू होते . मात्र दुसरीकडे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी एकूण 3 पदाला एकेकी पद दाखविण्याचा प्रयत्न करून जाहिरात काढली आणि त्यानंतर एकेकी 3 पदावर उमेदवारांचा साक्षात्कार घेउन निवड यादी प्रसिद्ध केली. त्यानंतर अर्जदार ला एकेकी 3 पदाला बिंदू नामावली लागू होत नसल्याचे सांगितले। त्यामुळे प्रथम दृष्ट्या असे दिसून येते की मनपा आयुक्तांनी सुनियोजित कट रचून आणि मागासवर्गीय उमेदवारांना जाणीवपुर्वक या नियुक्ती पासून दूर ठेवले आहे, असा आरोपही झांबरे यांनी तक्रारीत केला. याशिवाय आस्थापना वर नसलेल्या जागेवर जाहिरात काढणे, निवळ यादी प्रसिद्ध करणे हे शासनाचे व उमेदवारांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे यावरून हे स्पस्ट दिसून येते की याचात आर्थिक हितसंबंध गुंतल्याची शक्यता नाकारता येत नाही.
वरील विषयाचा अनुषंगाने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी एकूण 3 जागा असतांना त्याला एकेकी दाखवून बिंदूनामावली (रोष्टर कायदा) ला हरताळ फासले असल्याने तसेच गुन्हेगारी कट रचून मागासवर्गीय लोकांना नियुक्ति निवड प्रक्रिये पासून वंचित ठेवल्याने त्यांच्यावर कलम 120 ब अंतर्गत भादवी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी झांबरे यांनी तक्रारीत केली. मनपा आयुक्त राधाकृष्ण बी व इतरांनी संगनमत करून पद व अधिकाराचा गैरवापर करीत आस्थापना नसलेल्या जागा भरतीची वृत्तपत्रात जाहिरात देण्यासाठी नियमबाह्यरित्या, मनपाच्या पैशाची अफरातफर केली. त्यामुळे गैरर्जदारावर व इतरांवर 420,467,468 भादवी कलम अंतर्गत गुन्हा दाखल करावा, असेही झांबरे तक्रारीत म्हणाले आहेत.